Dhan Prapti Puja

‘‘मनोकामना पूर्ती अष्टलक्ष्मी पूजा’’

सांसारीक मनुष्याच्या आयुष्यात माँ लक्ष्मी देवीचा आशिर्वाद अत्यंत आवश्यक आहे. लक्ष्मीदेवीचा आशिर्वाद प्राप्त असल्यास धनप्राप्ती होते व कुटुंबात सुख-शांती व आनंद राहतो. लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होण्याकरीता देवीची मनोभावे आराधना करणे आवश्यक आहे.

लक्ष्मी देवीची आठ रूपे आहेत, ज्यांना “अष्टलक्ष्मी” म्हणतात. लक्ष्मीदेवी आपल्या ह्या आठ रूपांद्वारे आराधना करणाऱ्या भाविकांच्या (भक्तांच्या) कुटुंबास आशिर्वाद देते व त्या कुटूंबाची मनोकामना पूर्ण करून त्यांचे आयुष्य सुख शांतीमय व समृद्ध करते. 

अष्टलक्ष्मीची आठ रूपं खालील प्रमाणे आहेत.

१. धनलक्ष्मी – लक्ष्मी देवीचे हे रूप धन-संपत्ती व समृद्धी देणारे आहे. हया रूपाला “वैभवलक्ष्मी” म्हणून देखील ओळखले जाते.

२. संतानलक्ष्मी – आपल्याला चांगली सुदृढ व बुद्धिमान संतान असावी, ही मनोकामना पूर्ण करणारी संतानलक्ष्मी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असलेली संतान शारीरिक व बौद्धिक दृष्टीने प्रगती करावी, ही भाविकांची मनोकामना सुद्धा संतानलक्ष्मी पूर्ण करते.

३. धैर्यलक्ष्मी – आयुष्यात यश मिळवण्याकरिता धैर्य (पेशन्स) असणे आवश्यक आहे. परिस्थीती किती ही कठीण असली, तरीही धैर्यवान माणूसच त्यावर विजय प्राप्त करू शकतो. ही मनोकामनापूर्ती धैर्य लक्ष्मीच्या आराधने द्वारा करता येते.

४. गजलक्ष्मी – गज (हत्ती) हे राजसी वैभवाचे प्रतिक आहे. गजलक्ष्मीच्या या रूपात दाखवलेले पांढरे हत्ती, हे इंद्र देवाचे वाहन ऐरावत आहे. गजलक्ष्मीची आराधना केल्याने राजसी वैभव प्राप्त होण्याची मनोकामना पूर्ण होते.

५. विद्यालक्ष्मी- आपण मिळवलेल्या विद्येचे धनात रूपांतर करण्याची किमया अर्थात आपल्या शिक्षणापासून आपल्या नोकरी-व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याचा आशिर्वाद विद्यालक्ष्मी देते.

६. विजयलक्ष्मी – आपण हाती घेतलेल्या कार्यात आपल्याला भरघोस यश, अर्थातच विजय मिळावा, ही मनोकामनापूर्ती होण्याकरिता विजयलक्ष्मी देवीची आराधना करावी.

७. धान्यलक्ष्मी – धान्यलक्ष्मीची आराधना केल्याने आपल्या कुटुंबास “अक्षयपात्र” चा आशिर्वाद मिळतो. या आशीर्वादामुळे कुटुंबास कधीही “अन्नधान्या” ची कमतरता भासत नाही.


८. आदीलक्ष्मी – ब्रह्मांड पुराणाप्रमाणे, आदीलक्ष्मी पासूनच ब्रम्हा-विष्णू-महेश, जे या सृष्टीचे रचयिता, रक्षणकर्ता व संहारक आहेत, त्यांची उत्पत्ती झाली आहे. आदीलक्ष्मी ही संपूर्ण ब्रह्मांडाची माता आहे, व आदीलक्ष्मीची आराधना केल्याने सर्व देवीदेवतांचा आशिर्वाद आपल्या कुटूंबास मिळतो.

अष्टलक्ष्मी पूजेचे इतर फायदे –

१. वैवाहिक विवाद ( Marital Discord ) सोडवण्यासाठी मदत मिळते.

२. “विवाह होण्यास /जमण्यास होणारा उशीर( Delay )” हया समस्येचे समाधान
मिळते.

३. कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर “पारिवारीक संबंध मधुर” होतात. 

                  सांसारीक माणूस अत्यंत परिश्रमपूर्वक आपली व आपल्या कुटूंबाची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. परिश्रम आवश्यक असले तरीही लक्ष्मी देवीचा आशिर्वाद ज्यांना प्राप्त आहे, अशा भाविकांची आर्थिक प्रगती घडून येते, व ते एक समृद्ध व आनंदमय आयुष्य जगतात.

हया कारणें “मनोकामनापूर्ती अष्टलक्ष्मी पूजा” करणे आवश्यक आहे.

प्रसाद पॅकेज:

लेमिनेटेड रंगीत अष्टलक्ष्मीचे छायाचित्र

प्रसाद हळद – कुंकू

प्रसाद मिश्री

वस्त्र प्रसाद – Semi पैठणी साडी
(ही साडी पावित्र्य, समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक आहे)